Tuesday 10 December 2013

विश्वास


लिखाणाचे निमित्त गेल्या रविवारच्या सप्तरंग मध्ये आलेला संदीप वासलेकर यांचा लेख ' विश्वास ठेवायला शिका'. 

मध्यंतरी वाचण्यात आले की  भारतात  2.89% लोक income tax return भरतात. फक्त 3% लोकांचा पगार return भरण्या  इतका आहे आणि बाकीच्यांचा नाही याच्या वर विश्वास ठेवणे अवघड आहे.
आपल्या कडे खूप मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या पावत्या (cash receipts)  कच्या स्वरूपाच्या असतात, अगदी   मोठ्या व्यापारांकडून सुद्धा असे होणे गैर धरले जात नाही. एखाद्याने आग्रहाच धरला तर पावती मिळते, बहुतेक नाराजी पत्करून.  यात औषध  दुकाने, किराणामाल व्यापारी, सोनार, अगदी dentist, आणि डॉक्टर सुद्धा येतात. ही यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढू शकते. हे सर्व अतिशय सत्छील मनाने सर्व करतात आणि फक्त वेळ वाचवायला पावती देत नाही, ह्या वर विश्वास ठेवणे कठीण आहे.

अतिशय धोक्याचे म्हणजे एखादा औषध दुकानदार तारीख गेलेले औषध देणार नाही याची देखील गवाही देता  येणार नाही. मुद्दाम म्हणून नव्हे तर, हे किती गंभीर आहे याची बर्याच जणांना माहितीच नाहीये.  औषध दुकानात  pharmacyचे  पदवीधर कितीजण असतात,  बहुदा ज्याच्या नावावर दुकान किंव्हा licence असते तेवढा एकच.

माणूस हा सवयींचा गुलाम असतो चांगल्या - वाईट दोन्ही. जर आपण कायदा पाळला तर आपली पुढची पिढी ते शिकणार.चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो पण ते काही अशक्य नाही. विकसित देशात कायदा पाळायची सवय झाल्याने दुसरी व्यक्ती काही गैर करेल असे साधारण पाने कोणाच्या ध्यानी येत नाही आणि म्हणून ते विश्वास ठेवतात. 

विकसित देशात कायदा मोडणे तसे सोपे नाही, परत तिथे पळवाटा ही नाही. 'हम करे सो कायदा' हे फक्त आपल्या देशात. एक सोपे उदाहरण म्हणजे तीन वेळा गाडी चालवण्याचे नियम मोडले तर  driving licence रद्द होते. स्पीड लिमिट साठी जागो जागी कॅमेरे लावून तपासणी होत असते. सर्वात सोयीची गोष्ट असते कायदा पाळणे.  आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे परदेशी विद्यापीठात master किंवा PhD चे संशोधन (thesis) जमा केल्या वर  मुल्यांकन  करण्यास पाठवण्याच्या आधी एका विशिष्ट software द्वारे त्याची विश्वासहर्ता तपासली जाते.

 लेखात  म्हटले "…जर नागरिक लोकप्रतिनिधींकडं आपली खासगी गाऱ्हाणी घेऊन गेले नाहीत, तर लोकप्रतिनिधी अवैध मार्गानं पैसे कमावू शकणार नाहीत."
सर्वांना शिक्षण आणि पुढे नोकरी/व्यवसाय नियमानुसार मिळाला तर लोकप्रतिनिधींकडं जायचे प्रमाण कमी होणार. सर्व आर्थिक व्यवहार बँके मार्फत होणे गरजेचे आहे जेणे करून फसवणे सोपे राहणार नाही.  तसेच प्रत्येक व्यवसायाला आपण मान दिला पाहिजे आणि योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे.  जेंव्हा समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारेल तेंव्हाच एकमेकावरील विश्वास आपोआप वाढेल.No comments:

Post a Comment