सबंध जगात वेगवेगळ्या देशांत, प्रांतात, गावांत वेगवेगळ्या community traditions, स्थानिक परंपरा असतात. काही वेळा त्या धार्मिक स्वरूपाच्या असतात आणि काही वेगवेगळ्या प्रसंगी सुरु होतात आणि पुढे चालू राहतात. धार्मिक, जसे सणानिमित्त जत्रा आणि इतर परंपरा, जसे दिवाळीच्या वेळीस लहान मुलांचे किल्ले किंवा पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लागणारी जिलेबीची दुकाने.
नॉर्वेच्या बर्गन (Bergen ) या गावी, नाताळच्या काळात गावाची छोटी प्रतिकृती करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात
१९९१ साली झाली. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि मग स्थानिक नगरपालिकेच्या पुढाकाराने ती एक परंपराच झाली.
याचे वैशिष्ट म्हणजे सर्व आकृत्या ginger bread cookies ( सुंठ घालून केलेली बिस्किटे ) ने तयार करतात. यात घरे, शाळा, गाड्या, दुकाने, बाजार, बोटी, जनावरे आणि खूप काही असते. बिस्कीटाची आकृती तयार करून त्यावर पिठी साखर आणि रंगीत गोळ्यांनी ती सजवितात. स्थानिक नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. परिसरातील बालवाड्या, शाळा, संस्था आणि हजारहून अधिक कुटुंबेयात सहभागी होतात.
हे जगातले सर्वात मोठे आणि वैशिष्टपूर्ण असे बिस्किटांचे गाव आहे. या वर्षी यात १९०० इमारती आणि आगगाड्या असून ३८० चौ. मी. क्षेत्रात हे वसविले आहे. प्रत्येक वस्तू ही आपल्यात कलात्मक आहे.या प्रकल्पात अगदी ३ - ४ वर्षांच्या चिमुरड्यान पासून ते पंचात्तरी ओलांडलेले आजी-आजोबा पण सहभाग घेतात.
अश्याच पद्धतीचे गाव न्यूयॉर्क येथे ही तयार करण्यात आले आहे. त्याची नोंद गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. ते गाव एका व्यावसायिक आचाऱ्याने तयार केले असून ते संपूर्ण खाणे योग्य आहे. तसेच सर्व बिस्कीटे एकच पाककृती ने तयार केलेली आहेत. ते गाव गिनीस बुकसाठी लागणारी नियमावली डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. याच्या उलट बेर्गेन येथील गाव लोक सहभागातून तयार झाले आहे.
वरील फोटो pepperkakebyen च्या फेसबुकच्या पानावरून घेतलेले आहे.

सर्व
हक्क लेखकाकडे. ब्लॉग ऍग्रीगेटर वगळता येथील मजकूर कुठेही (ब्लॉग, फेसबुक
वॉल) प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखांविषयी
इतरांना सांगायचे असेल तर कृपया ब्लॉगचा दुवा द्यावा. - See more at:
http://rbk137.blogspot.no/#sthash.Jb5n5gjH.dpuf
No comments:
Post a Comment