रोजच्या एकसुरी आयुष्यात नाविण्य आणण्यासाठी आपण छंद जोपासतो. मित्र - मैत्रीण, परिवार, ग्रुप मध्ये चर्चा होते आणि मग छंदाला सुरुवात. एकदम जोर शोर से.
यात प्रामुख्याने आलेले छंद म्हणजे, व्यायाम - सकाळ/संध्याकाळ फिरायला जाणे, पुस्तक वाचन ( धार्मिक ग्रंथ पण आले ), … यात आता ब्लॉग लिहिण्या (blogging) ची भर पडली आहे.
सुरुवात होते पण सातत्य राहते का?
बहिणाबाई म्हणतात …
'मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्यानं चालल्या
पान्यावर्हल्या रे लाटा'
मग आज इधर और कल उधर. आज एक छंद उद्या दुसरा.
मी analyst आहे हा काही माझा दोष नव्हे तेंव्हा माहिती हातात आली की त्याचे आकलन (analyse) होणे हे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर आदत से मजबूर. बहिणाबाई परत असे ही म्हणतात…
'मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर '
शेवटी मी analysis करायचे ठरविले. एक लक्षात असू देत कि statistical analyst ला एका unit/item मध्ये रस नसतो. तो संपूर्ण गटाचा अभ्यास करतो. मी तेच केले.
साधारणपणे ४०० मराठी ब्लॉग्सचे अवलोकन केल्या वर असे दिसते कि

- साधारण पणे १० ब्लॉग्स पैकी ४ ब्लॉग्स 'कविता, कथा, सिनेमा, करमणूक (entertainment)चे, १ खाणे/पिणे/पदार्थ करणेची माहिती विषयी, १ technology, १ चालू घडामोडी विषयी, १ फालतू आणि २ इतर विषयीचे असतात.
- सातत्य न राखणारे किंवा राखू न शकणारे, साधारणपणे ५ posts मधेच गारद होतात.
- आणखीन एक म्हणजे एका व्यक्तीने अनेक blog सुरु केले तर सातत्य राखणे कठीण असते किंवा हातात खूप वेळ हवा. नाहीतर लोकांचा कल एका विशिष्ट blog कडेच राहतो.
- चालू न शकणारे काही personal blogs आहेत किंवा होते, जे देशातील- विदेशातील बातम्या (चालू घडामोडी ) देतात. एवढी online मोफत वृतपत्रे मिळत असताना कोणी blog का वाचेल?
- तुरळक वेळा एकच post एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या blog वर दिसते.
- बरेच ब्लॉग्स जाहिरातींनी भरले आहेत.
- साहित्य क्षेत्राशी निगडीत लोकांना ब्लॉग्सचा विशेष फायदा होताना दिसतो.
- तसेच आपल्या productची अप्रत्यक्षपणे जाहिरात करणारे पण आहेत.
No comments:
Post a Comment